
वेंगुर्ला : आपला सिंधुदुर्ग जिल्हा हा कलाकारांचा जिल्हा आहे. भाजपचे युवा नेते विशाल परब यांच्या माध्यमातून विविध चांगले कार्यक्रम उपक्रम राबविले जात आहेत. जिल्ह्यातील युवक आणि युवती यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी सांस्कृतिक महोत्सव सुरु आहे. या उपक्रमांचा तरुण तरुणीनी फायदा करून घेऊन आपले कलागुण आणखीन विकसित करावेत असे प्रतिपादन माजी आमदार राजन तेली यांनी आज शुक्रवारी (१३ ऑक्टोबर) वेंगुर्ले येथे केले.
भाजपचे युवा नेते विशाल परब यांच्या वाढदिवसानिमित्त विशाल परब मित्रमंडळ व भाजपतर्फे व 'भव्य दिव्य सिंधु युवा विशालोत्सव शोध नाविन्याचा' व "राज्यस्तरीय विशाल दांडिया स्पर्धा या भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी आज सकाळी विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे उदघाट्न माजी आमदार राजन तेली यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाले.
यावेळी व्यासपीठावर भाजपा जिल्हा कार्यकारिणी सचिव शरद चव्हाण, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना देसाई, तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर, बॅरिस्टर खर्डेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आनंद बांदेकर , तालुका सरचिटणीस बाबली वायंगणकर, भाजपा शहर अध्यक्ष सुरेंद्र चव्हाण, बाळू प्रभू, जिल्हा कार्यकारिणी सदस्य वसंत तांडेल, ज्येष्ठ नटवर्य पप्पू नांदोस्कर , जयंत मोंडकर, रमेश नार्वेकर, शैलेश जामदार, प्रा वैभव खानोलकर, संजय पाटील आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना प्रा. आनंद बांदेकर यांनी युवाईला व्यासपीठ मिळवून देण्यासाठी विशाल परब यांच्यामार्फत राबविण्यात येत असलेला उपक्रम स्तुत्य असल्याचे उदगार काढले. या कार्यक्रमात प्रसन्ना देसाई यांच्या हस्ते मान्यवरांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात श्री गणेश वंदनेने करण्यात आली.
यानंतर समूहनृत्य , जोडीनृत्य , मिमिक्री आदी सांस्कृतिक कार्यक्रम सुरु करण्यात आले. निवेदक म्हणून शुभम धुरी हे काम पाहत असून या स्पर्धेचे परीक्षक म्हणून महेंद्र मातोंडकर , बी. टी. खडपकर काम पाहत आहेत. उदघाट्न कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रा. सचिन परुळकर यांनी केले. सायंकाळी राज्यस्तरीय विशाल दांडिया स्पर्धा संपन्न होणार असल्याचे याचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन प्रसन्ना देसाई यांनी केले आहे.