विजयाबद्दल दीपक केसरकरांचे अभिनंदन : विशाल परब

Edited by:
Published on: November 24, 2024 14:43 PM
views 773  views

सावंतवाडी : मतदारसंघातील विजयाबद्दल दीपक केसरकर यांचे अभिनंदन. ते ज्येष्ठ नेते आहेत. सावंतवाडी विधानसभेतील जनतेने त्यांच्या ज्येष्ठत्वावर पुन्हा एकदा विश्वास दाखवला आहे. जनतेच्या कौलाचा मी आदर करतो असे मत अपक्ष उमेदवार विशाल परब यांनी व्यक्त केले.

ज्यांनी माझ्यावर विश्वास दाखवत मला मतदान केले त्यांचा मी आभारी आहे. मतदानाच्याही पलीकडे, पूर्ण मतदारसंघात निवडणूक काळात जनतेने मला दिलेल्या प्रेम व आपुलकीबद्दल मी सर्वांचा नेहमीच ऋणी राहीन.सावंतवाडी मतदारसंघाच्या विकासासाठी, सर्वसामान्य जनतेच्या आरोग्याच्या प्रश्नांसाठी आणि बेरोजगार युवा वर्गाच्या भविष्यासाठी माझे प्रत्येकाला नेहमीच सकारात्मक योगदान राहील. महाराष्ट्रात बहुमताने निवडून आलेल्या महायुती सरकारचेही अभिनंदन अपक्ष उमेदवार विशाल प्रभाकर परब यांनी केल आहे.