दोडामार्ग भाजप कार्यालयास विशाल परब यांनी दिली भेट

Edited by: भरत केसरकर
Published on: April 11, 2024 13:42 PM
views 128  views

दोडामार्ग : विशाल परब यांनी आज दोडामार्ग तालुक्याच्या दौऱ्यावर असताना भारतीय जनता पक्षाच्या तालुका कार्यालयास सदिच्छा भेट दिली.यावेळी महात्मा जोतिबा फुले यांना जयंतीनिमित्त अभिवादन केले व पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधला.

याप्रसंगी दोडामार्गचे माजी नगराध्यक्ष चेतन चव्हाण, भाजपा दोडामार्ग तालुका उपाध्यक्ष  सुधीर दळवी, सरपंच देवेंद्र शेटकर, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष पराशर सावंत तसेच दोडामार्गचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.