विशाल परब यांनी घेतले माणगाव खोऱ्यातील गणरायांचे दर्शन

Edited by: भरत केसरकर
Published on: September 24, 2023 15:56 PM
views 78  views

कुडाळ : भाजपचे युवा नेते आणि युवा उद्योजक विशाल परब यांनी आज माणगाव खोऱ्यातील घरोघरी जात गणपतीचे दर्शन घेतले. विशाल परब यांनी या झंजावती दौऱ्यात आपल्या कार्यकर्त्यांसह सर्वसामान्यांच्या घरी जात हे गणपतीचे दर्शन घेतले.

यावेळी भाजपचे युवा नेते विशाल परब, यांच्यासोबत जिल्हा बँक संचालक प्रकाश मोर्ये, दादा साईल,माजी उपसरपंच दत्ताराम कोरगावकर दीपक काणेकर नाना बोगार,माजी ग्रामपंचायत सदस्य सचिन सावंत, माजी सरपंच सचिन धुरी, नाना बोगार यासह भाजपचे असंख्य कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते. या दौऱ्यात त्यांनी सर्वसामान्यांच्या घरी जात गणपती दर्शन घेतले. ज्येष्ठ नागरिकांची अपुलकीने विचारपोस केली.विशाल परब हे दरवर्षी माणगाव खोऱ्यातील बहुतांश कार्यकर्ते व सर्वसामान्यांपर्यंत पोहचून गणेश दर्शन घेत असतात.