विशाल परब यांच्यावतीने 'रिलोत्सव'

भव्य रिल्स स्पर्धा !
Edited by: विनायक गावस
Published on: October 11, 2025 10:37 AM
views 191  views

सावंतवाडी : निसर्गसंपन्न कोकण हे कलाकारांसाठी 'कलाविष्काराचे आंगण' मानले जाते. आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगातही कोकणच्या सौंदर्याने आपले महत्त्व सिद्ध केले आहे. हिरवागार शालू पांघरलेले डोंगर, खोल दऱ्या, डोळ्यात न सामावणारा निळा अथांग समुद्र आणि कोकणची चिरतरुण परंपरा व संस्कृती हीच कोकणची खरी ओळख आहे.

याच कोकणच्या सौंदर्याला, संस्कृतीला आणि स्वाभिमानाला जागतिक उंची आणि नवी ओळख मिळवून देण्यासाठी तसेच कलाकारांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी युवा नेते विशाल परब यांच्या वाढदिवसानिमित्त 'रिलोत्सव' २०२५ या 'भव्य रिल्स स्पर्धेच' आयोजन करण्यात आल आहे.


स्पर्धेचे विषय हे कोकण माझ्या नजरेतून (पर्यटन, संस्कृती, लोककला, धार्मिक व आध्यात्मिक कोकण) असून युवा नेते विशाल परब यांनी कोकणचे सौंदर्य, स्वाभिमान, अभिमानाचे दर्शन आपल्या कलेतून सादर करण्याचे आवाहन कलाकारांना केले आहे. या स्पर्धेत बहुसंख्येने सहभागी होऊन आपला कलाविष्कार सादर करू शकतात. प्रत्येक स्पर्धकाने केवळ एकच रिल https://drive.google.com/drive/folders/1A7BgYCwY-ug4bwWunkLnRj_KmjfvWLJX?usp=drive_link या लिंकवर पाठवायचे आहे. स्पर्धकांनी स्पर्धेसाठी तयार केलेले रिल्स विशाल परब यांच्या @vishalparabspeaks आणि @vishal.parab_fc **या पेजवर Collaboration करणे बंधनकारक आहे. दिनांक 15 ऑक्टोबर 2025 पर्यंत हे रिल्स पाठवण बंधनकारक राहणार असून ते स्पर्धेसाठी ग्राह्य धरले जाणार आहेत. या स्पर्धेसाठी नियम व अटी लागू असतील. कलाकारांनी या स्पर्धेत मोठ्या उत्साहाने सहभागी होऊन 'चैतन्यमय कोकण' या विषयावर आपल्या सर्जनशील रिल्स सादर कराव्यात, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.