
सिंधुदुर्गनगरी : विशाल सेवा फाउंडेशन व भारतीय जनता पार्टीच्या वतीने आयोजित 'शिवगर्जना' या महानाट्याचे आमंत्रण सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांना भेट देऊन विशाल सेवा फाउंडेशनचे अध्यक्ष विशाल परब यांनी दिले आहे.
विशाल परब यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांची ओरोस येथे त्यांच्या कार्यालयात भेट घेतली. त्यावेळी त्यांच्यासोबत भारतीय भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, जिल्हा बँकेचे संचालक प्रकाश मोर्ये आधी उपस्थित होते.
या कार्यक्रमात उपस्थित राहण्याचे निमंत्रण विशाल परब यांनी सौरभ कुमार अग्रवाल यांना दिले आहे. पोलीस दलाच्या वतीने सुरक्षेच्या दृष्टीने मदतीची मागणी विशाल परब यांनी पोलीस अधीक्षकांनी जवळ केली. त्यावेळेस या नाटकाला सर्वतोपरी सहकार्य करू, असे आश्वासन जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांनी दिले. यावेळी विशाल परब यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांचे आभार मानत धन्यवाद दिले आहेत.