
सावंतवाडी : मांद्रेचे तरूण, आमदार तडफदार आमदार जीत आरोलकर यांची विशाल सेवा फाऊंडेशनचे अध्यक्ष विशाल परब, भाजपचे प्रवक्ते संजू परब व प्रभाकर परब यांनी भेट घेवून शिवगर्जना ह्या महानाटयाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहण्याचे खास आमंत्रण दिले. भाजपचे माजी नगराध्यक्ष संजू परब यांच्या सावंतवाडीतील "जगदंबा" ह्या निवासस्थानी आमदार जीत आरोलकर आज आले होते. यावेळी विशाल परब यांनी ही भेट घेत त्यांना ह्या शिवगर्जना महानाट्याला प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रण दिले आहे. यावेळेस विशाल परब, माजी नगराध्यक्ष संजू परब, बांदा माजी सरपंच अक्रम खान, उद्योजक प्रभाकर परब, सत्यवान बांदेकर, तेजस माने, साईप्रसाद भोई आदी उपस्थित होते.