
सावंतवाडी : नगरपरिषद निवडणूकीच्या अंतिम टप्प्यात शिवसेना आणि भाजप यांच्यात राडा झाला. रात्री उशिरापर्यंत याबाबत पोलिस ठाण्यात घडामोडी सुरू होत्या. भाजपचे युवा नेते विशाल परब यांच्या माध्यमातून देखील तक्रार दाखल केल्याची माहिती मिळत आहे. मात्र, याबाबत विचारलं असता श्री. परब यांनी 'नो कमेंट्स' अशी प्रतिक्रिया दिली.
सायंकाळपासून रात्री ११. ३० पर्यंत सावंतवाडी पोलिस ठाण्यात या घडामोडी सुरू होत्या. सालईवाडा परिसरात झालेल्या घटनेनंतर पुन्हा पोलिस ठाण्यात देखील दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले. भाजप युवा नेते विशाल परब रात्री उशिरापर्यंत पोलिस ठाण्यात होते. रात्री ११.३० च्या दरम्यान त्यांच्या खासगी सुरक्षारक्षकाला पोलिसांकडून वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आले. तक्रारी बाबत विचारलं असता विशाल परब यांनी नो कमेंट्स अशी प्रतिक्रिया दिली.










