
वेंगुर्ले : तूळस पंचक्रोशीतील गरजू रुग्णांसाठी मुंबईतील अनुभवी आणि तज्ञ डॉक्टर्स यांच्या सहकार्याने मोफत आरोग्य तपासणी शिबिर आणि रोग निदान झाल्यावर त्यावर मोफत औषधे दिली जाणार आहेत. सर्व सामान्य नागरिकांसाठी डॉक्टर म्हणजे देवमाणूसच असतो. सर्वसामान्य नागरिकांना उत्तम दर्जाच्या आरोग्य सुविधा नेहमीच मिळायला हव्यात. भविष्यकाळात सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात उत्तम दर्जाच्या आरोग्य सुविधा उभारणार असल्याचे मत भारतीय जनता पक्ष युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांनी तुळस येथे व्यक्त केले.
विश्व हिंदू परिषद, सिंधुदुर्ग वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग, तुळस आणि कुंभारटेंब युवक कला क्रिडा मंडळ, तुळस यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य तपासणी आणि औषध वाटप शिबिर आयोजित करण्यात आले होते. याप्रसंगी विशाल परब यांनी उपस्थित राहून कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या. यावेळी डॉ.दिलीप पवार, डॉ.रोहन कुलुर, डॉ.शामला कुलुर, डॉ.गणेश मुंडे, डॉ. शाम राणे, डॉ.समृद्धी कांबळी, डॉ.किशोर धोंड, डॉ.राजन शिरसाट, डॉ.माधुरी शिरसाट, नंदू आरोलकर, तुळस सरपंच रश्मी परब, संतोष गावडे, उपसरपंच सचिन नाईक, भाजप जिल्हा उपाध्यक्ष बाळू देसाई, वेताळ प्रतिष्ठान अध्यक्ष विवेक तिरोडकर, माजी सरपंच विजय रेडकर, अणसूर सरपंच सत्यविजय गावडे, आनंद तांडेल, नितीन चव्हाण, जयवंत तुळसकर, रुपेश कोचरेकर, आप्पा धोंड आदी मान्यवर उपस्थित होते.