विशाल परबांच्या माध्यमातून वारकरी संप्रदायातील मंडळींना देवदर्शन

Edited by: दिपेश परब
Published on: June 15, 2024 15:10 PM
views 56  views

वेंगुर्ले : भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांच्या माध्यमातून वेंगुर्ले तालुक्यातील ४५ वारकरी संप्रदायातील मंडळींना देवदर्शन सहलीचा शुभारंभ आज शनिवारी १५ जून चांदेरकर महाराज विठ्ठल मंदिर येथे संपन्न झाला. यावेळी विशाल परब यांनी सर्व वारकरी बंधू-भगिनींना यात्रेसाठी शुभेच्छा दिल्या.

मोहीनी एकादशी निमीत्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात विशाल परब यांनी नारायणराव राणे साहेब हे रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातुन विजयी झाल्यावर वारकरी मंडळींना मोफत देवदर्शन सहल घडवून आणेन, असे अभिवचन दिले होते. त्याचीच पुर्तता म्हणुन तुळजापूर - अक्कलकोट - पंढरपूर - नृहसिंहवाडी - महालक्ष्मी कोल्हापूर अशी तीन दिवसांची सहल आयोजित करण्यात आली आहे. आज त्यांनी ते वचन पूर्ण केले. प्रसंगी वारकरी सांप्रदायातील ज्येष्ठ मंडळींनी विशाल परब यांचे कौतुक करत त्यांना आशीर्वाद दिले. अध्यात्मिक कार्यक्रमाच्या माध्यमातून अनेकदा परब यांनी संस्कृतीचे जतन केले आहे. यावेळी भाजप उपाध्यक्ष प्रसन्ना देसाई, जिल्हा नियोजन समिती सदस्य राजन गिरप, भाजप तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर, मच्छिमार नेते वसंत तांडेल, तालुका सरचिटणीस बाबली वांयगणकर, सुरेंद्र चव्हाण, मनोहर तांडेल यांच्यासाहित वारकरी सांप्रदायातील जेष्ठ मंडळी, स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते.