
सावंतवाडी : तालुक्यातील आरोंदा येथील रस्त्यावर पट्टेरी वाघ दिसून आला असून गोवा येथे जात असलेल्या चारचाकी गाडीसमोर रात्रीच्या सुमारास या वाघान दर्शन दिल्याची माहिती मिळत आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यात हा वाघ रस्त्यावर बसलेला दिसून येत आहे.
आरोंदा येथील उमळात भागातील हा व्हिडिओ असल्याचे सांगण्यात येत आहे. याबाबत वनविभागाकडे
चौकशी केली असता अद्याप कोणतीही अशी माहिती नसल्याचे वन अधिकाऱ्यांनी सांगितले. याबाबत चौकशी करून माहीती देऊ असं ते म्हणाले. दरम्यान, हा व्हिडिओ चंद्रपुर येथील असल्याचेही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामुळे हा पट्टेरी वाघ नेमका कुठला ? याबाबत अधिकृत माहिती वनखातच देऊ शकेल. सद्यस्थितीत, सिंधुदुर्ग जिल्ह्यात पट्टेरी वाघ असल्याचे निदर्शनास आल्याने हा वाघ आरोंदा येथे दिसल्याची जोरदार चर्चा सर्वत आहे. सोशल मीडियावर सध्या हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे.