विनोदिनी आत्‍माराम जाधव फाऊंडेशनचा पुरस्‍कार वितरण सोहळा उद्‍या

Edited by:
Published on: May 02, 2026 18:59 PM
views 18  views

कणकवली : विनोदिनी आत्‍माराम जाधव फाऊंडेशन, वेंगुर्ले आयोजित तर सिंधुदुर्ग जिल्‍हा सम्‍यक साहित्‍य संसद यांच्‍या सहयोगाने क्रांतीज्‍योती सावित्रीबाई फुले राज्‍यस्‍तरीय काव्‍यपुरस्‍कार वितरण सोेहळा २०२६ रविवार ३ मे रोजी सायंकाळी ३.३० वा. वेंगुर्ले येथील सातेरी मंदिर भक्‍तनिवास सभागृहात होणार आहे. यावर्षीचा पुरस्‍कार वाशिम येथील आंबेडकरी कवी महेंद्र ताजणे यांच्‍या 'खूप काही आणखी' या काव्‍यसंग्रहाला जाहीर झाला आहे.

ताजणे यांना प्रसिद्‍ध साहित्‍यिक डॉ. श्रीधर पवार यांच्‍या हस्‍ते गौरविण्‍यात येणार आहेत. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी इंजिनियर तथा विनोदिनी फाडेशनचे संस्‍थापक अनिल जाधव असणार आहेत. कार्यक्रमाचे उद्‍घाटन नूतन मराठा हितवर्धक संघ मुंबईचे अध्‍यक्ष प्रविण परुळेकर यांच्‍या हस्‍ते होणार असून यावेळी फुले – शाहू – आंबेडकर विचारमंच वेंगुर्लेचे अध्‍यक्ष जयप्रकाश चमणकर, प्रसिद्‍ध साहित्‍यिक सुनील हेतकर, प्रसिद्‍ध कवी वीरधवल परब, संत साहित्‍याचे गाढे अभ्‍यासक देवदत्त परुळेकर आदी उपस्‍थित राहणार आहेत. यावेळी कवी संमेलनही होणार असून त्‍याच्‍या अध्‍यक्षस्‍थानी प्रा. सिद्‍धार्थ तांबे असणार आहेत. साहित्‍यप्रेमींनी उपस्‍थित रहावे, असे आवाहन करण्‍यात आले आहे.