माणगावच्या श्री वा. स. विद्यालयाचा 'बारावी' परीक्षेत डंका

८२.३३ टक्क्यांसह आर्या गावडे विद्यालयात प्रथम ; एकूण निकाल ९३.९० टक्के
Edited by:
Published on: May 02, 2026 19:28 PM
views 47  views

कुडाळ : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या इयत्ता बारावी परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून, यात माणगाव येथील श्री वा. स. विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाने नेत्रदीपक यश संपादन केले आहे. विद्यालयाचा एकूण निकाल ९३.९० टक्के लागला असून वाणिज्य शाखेची विद्यार्थिनी आर्या गावडे हिने ८२.३३ टक्के गुण मिळवून विद्यालयात प्रथम येण्याचा बहुमान पटकावला आहे.

यावर्षी विद्यालयातून चारही शाखांमधून एकूण १६६ विद्यार्थी परीक्षेला बसले होते, त्यापैकी १५६ विद्यार्थी यशस्वीरीत्या उत्तीर्ण झाले आहेत. निकालाची परंपरा राखत विद्यार्थ्यांनी विविध विषयांत उत्तम गुण मिळवले आहेत.

विभागांनुसार गुणवत्ता यादी खालीलप्रमाणे:

विज्ञान विभाग:

विज्ञान शाखेतून दीक्षा धुरी ७५.५० टक्के गुणांसह प्रथम आली आहे. तनुजा वरक आणि रुचिका नाईक यांनी प्रत्येकी ६८.५० टक्के गुण मिळवत द्वितीय क्रमांक सामायिक केला आहे, तर सानिका धुमक ६६.३३ टक्क्यांसह तृतीय स्थानी राहिली.

वाणिज्य विभाग:

वाणिज्य विभागाचा निकाल लक्षवेधी ठरला आहे. आर्या गावडे हिने ८२.३३ टक्के गुणांसह प्रथम क्रमांक पटकावला. सोहम गावडे (७३.१७ टक्के) द्वितीय, तर दीक्षा परब (७२.८३ टक्के) हिने तृतीय क्रमांक मिळवला.

कला विभाग:

कला शाखेत सरिता कुंभार ७७ टक्क्यांसह प्रथम क्रमांकाची मानकरी ठरली. श्रेया हळदणकर हिने ७२.५० टक्क्यांसह द्वितीय आणि साक्षी लाड हिने ६७.३३ टक्क्यांसह तृतीय क्रमांक प्राप्त केला.

अकौंटन्सी व ऑफिस मॅनेजमेंट (व्यवसाय शिक्षण):

या विभागात भालचंद्र माणगावकर याने ७३.८३ टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला. महादेव धुरी (७२.८३ टक्के) द्वितीय आणि दत्तप्रसाद नाईक (६० टक्के) याने तृतीय क्रमांक पटकावला.

विद्यालयाच्या या देदीप्यमान यशाबद्दल यशस्वी विद्यार्थ्यांचे, मुख्याध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे व्यवस्थापन समिती व पालकांकडून भरभरून अभिनंदन करण्यात येत आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी शैक्षणिक गुणवत्तेत मारलेली ही झेप कौतुकास्पद असल्याचे बोलले जात आहे.