कुडाळ तालुक्याचा बारावीचा निकाल 97.72 टक्के

तालुक्यातील 5 विद्यालयांचा निकाल 'शंभर टक्के'
Edited by:
Published on: May 02, 2026 19:39 PM
views 30  views

कुडाळ : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेत कुडाळ तालुक्याने यंदाही यशाची परंपरा कायम राखली आहे. 

तालुक्याचा निकाल 97.72 टक्के लागला असून, गुणवत्तेच्या शिखरावर मुलींनी आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. कुडाळ हायस्कूल मधील वाणिज्य शाखेच्या गायत्री बागलकर (95.67 टक्के कॉमर्स) हिने तालुक्यात प्रथम येण्याचा मान पटकावला असून, द्वितीय क्रमांक ओरोस डॉन बॉस्को विद्यालयाच्या शुभ्रा युगलकिशोर प्रभूगावकर (94.83 टक़्के, कॉमर्स) तर तृतीय कुडाळ हायस्कूलच्या पुनम दिनेश दळवी (94.17 टक्के,कॉमर्स) हिने यश संपादन केले.कुडाळ तालुक्यातील 5 विद्यालयांनी 'शंभर टक्के' निकालाची मोहोर उमटवली आहे.