विनोद तावडे कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांशी साधणार संवाद

Edited by:
Published on: November 11, 2024 16:06 PM
views 228  views

कणकवली : कणकवली विधानसभा मतदारसंघाचे भाजप महायुतीचे उमेदवार नीतेश राणे यांच्या प्रचारासाठी भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे आणि माजी केंद्रीयमंत्री खासदार नारायण राणे यांची कणकवली विधानसभा मतदारसंघात मंगळवार १२ नोव्हेंबर रोजी बैठकांचे आयोजित करण्यात आले आहे.अशी माहिती भाजपा कणकवली विधानसभा प्रमुख मनोज रावराणे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी भाजपा जिल्हा सरचिटणीस संदीप साटम, कणकवली भाजपा तालुकाध्यक्ष दिलीप तळेकर उपस्थित होते. राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे , खासदार नारायण राणे हे भाजप महायुतीच्या कार्यकर्ते,पदाधिकारी यांच्याशी थेट संवाद साधणार आहेत.त्यासाठी १२ नोव्हेंबर रोजी  सकाळी ११ वाजता प्रहार भवन येथे बैठक होणार आहे.त्यानंतर देवगड तालुक्यातील फणसगाव कॅन्टीन येथील डॉ नारकर यांच्या निवासस्थानी दुपारी ३ वाजता बैठक होणार आहे. सायंकाळी ५ वाजता वैभववाडी शहरात भाजपा कार्यालय येथे बैठक होणार आहे.

या सर्व बैठकांना आमदार तथा उमेदवार नितेश राणे, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, महायुती च्या घटक पक्षांतील शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस चे जिल्हाध्यक्ष ,तालुकाध्यक्ष आदी पदाधिकारी या संयुक्त बैठकीला उपस्थित राहणार आहेत. देवगड तालुक्याचे सुपुत्र असलेले भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्या मार्गदर्शनामुळे कणकवली विधानसभा मतदारसंघातून महायुती चे उमेदवार नितेश राणे यांचे रेकॉर्ड ब्रेक मताधिक्याने विजय होण्यासाठी कार्यकर्त्यांना बळ मिळणार आहे. राष्ट्रीय सरचिटणीस तावडे यांनी देश पातळीवर जम्मू काश्मीर, उत्तरप्रदेश बिहार राज्यात त्यांच्यावर सोपवलेली जबाबदारी यशस्वी पार पाडत भाजपाचा झेंडा फडकवला आहे. त्यामुळे विनोद तावडे यांच्या मार्गदर्शनामुळे भाजपासह महायुती चे कार्यकर्ते अधिक जोमाने आमदार नितेश राणे यांचा न भूतो अशा विक्रमी विजयी हॅट्ट्रिक साठी काम करतील असे मनोज रावराणे यांनी सांगितले.