विनायक राऊतांचे शेवटचे दिवस शिल्लक राहीलेत : दीपक केसरकर

Edited by: विनायक गांवस
Published on: April 21, 2024 06:14 AM
views 294  views

सावंतवाडी : कोकणासाठी उद्धव ठाकरे, विनायक राऊत दहा वर्षांत काहीही करू शकले नाहीत. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी या जिल्ह्याच्या, कोकणच्या  विकासासाठी मोठ योगदान दिलं आहे‌. विनायक राऊत हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे निवडून आले. त्यांना याचा विसर पडला आहे. विनायक राऊत यांनी आपले किती दिवस शिल्लक आहेत ते मोजावेत. त्यांचे शेवटचे दिवस शिल्लक राहीलेत असा घणाघात दीपक केसरकर यांनी विनायक राऊत यांनी केलेल्या टीकेवर पलटवार करताना केला. सावंतवाडी येथील पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 

ते म्हणाले, दिल्लीच्या मंत्रीमंडळात नारायण राणेंनी नेतृत्व केलं आहे‌. पुन्हा एकदा त्यांनी शपथ घ्यावी अशी जनतेची इच्छा आहे. भरघोस मतांनी त्यांना निवडून देत मोदींच्या मंत्रिमंडळात पुन्हा एकदा पाठवणार आहे. येथील रोजगाराचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचा प्रकल्प दोडामार्ग तालुक्यात येत आहे. सिंधुदुर्गतील लोकांना रोजगारासाठी गोव्याला जाव लागू नये यासाठी पुढाकार घेतला आहे. २०० कोटींचा प्रकल्प इथे होत आहे. उद्धव ठाकरे, विनायक राऊत दहा वर्षांत काहीही करू शकले नाहीत. नारायण राणे यांनी या जिल्ह्याच्या कोकणच्या  विकासासाठी मोठ योगदान दिलं आहे‌. विनायक राऊत हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे निवडून आले. ते अपघातानं खासदार झाले आहेत. आता त्यांनी आपले किती दिवस शिल्लक आहेत ते मोजावेत. त्यांचे शेवटचे दिवस शिल्लक राहीलेत असा घणाघात दीपक केसरकर यांनी केला.