विनायक राऊतांकडून दलितांची डोकी भडकविण्याचा प्रयत्न : चंद्रकांत जाधव

Edited by: विनायक गांवस
Published on: April 30, 2024 11:33 AM
views 62  views

सावंतवाडी : महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत आणि कार्यकर्त्यांकडे प्रचाराला मुद्दे राहीले नसल्याने ते पंतप्रधान मोदी देशाचे संविधान बदलणार असा प्रचार करत आहे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना भारतरत्न द्यायला 34 वर्ष लावणारे काँग्रेस आणि त्यांच्यासोबत असणारे मित्रपक्ष देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी संविधान बदलणार असे सांगत आहे. त्यांच्याकडे प्रचाराचे मुद्देच नसल्याने ते संविधानाच्या मुद्द्यावरून दलित बांधवांची डोकी भडकविण्याचा प्रयत्न करत आहे असा आरोप भाजपाचे अनुसूचित जाती जमाती जिल्हा चिटणीस चंद्रकांत जाधव यांनी केला. महायुतीच्या प्रचार कार्यालयात पत्रकार परिषद घेत त्यांनी महाविकास आघाडीच्या आरोपांना उत्तर दिली.

चंद्रकांत जाधव म्हणाले, महाविकास आघाडीच्या उमेदवार विनायक राऊत आणि कार्यकर्त्यांकडे प्रचाराला मुद्दे राहीले नसल्याने ते पंतप्रधान मोदी देशाचे संविधान बदलणार असा प्रचार करत आहे. मुळात विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली असल्याने ते अशी वक्तव्य करत आहेत. मात्र, काही झाले तरी दलित बांधव एक दिलाने नारायण राणे यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहणार आहे. संविधान बदलणार असे काँग्रेस आणि मित्र पक्ष म्हणत असतील तर बाबासाहेब आंबेडकरांना याच काँग्रेसकडून भारतरत्न द्यायला 34 का लागली? या लोकांनी दलित बांधवांच्या वाढीवस्तीवर जाऊन कधी संविधानाचा गौरव केला आहे का ? उलट काँग्रेसकडून 106 वेळा घटना दुरुस्ती केली गेली आणि या दुरुस्त केलेल्या घटनेमध्ये अनेक त्रुटी राहिल्या आहेत. त्या त्रुटी सुधारण्यासाठी चारसोपाराचा नारा मोदींनी दिला आहे. त्यामुळे कोणी कितीही डोके भडकवण्याचा प्रयत्न केला तरी दलित बांधव कुठेही भरकटणार नाही. मोदींना साथ देण्यासाठी नारायण राणे यांना प्रचंड बहुमताने निवडून देऊन पुन्हा एकदा लोकसभेत पाठवणार आहे असं मत त्यांनी व्यक्त केल. यावेळी अनुसूचित जाती जमाती महिला जिल्हाध्यक्ष सोनिया मठकर, जिल्हा कोषाध्यक्ष अनंत आसोलकर, राजेश चव्हाण, प्रकाश कदम,वासुदेव जाधव, संजय डिंगणेकर, महेश चव्हाण, किशोर निगुडकर,उमेश मठकर आदी उपस्थित होते.