डॉ. आंबेडकरांचं संविधान संपविण्याचं काम भाजप करतंय : विनायक राऊत

Edited by: विनायक गांवस
Published on: March 22, 2024 08:55 AM
views 106  views

सावंतवाडी : आघाडी करणं किती महत्त्वाच होत हे सर्व पक्षांनी ओळखल. देशात हुकुमशाही वाटचालीच्या दिशेने कारभार चालू आहे. यासाठी एकत्र येणं आवश्यक होतं. दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना आरोप नसताना अटक केली गेली. विरोधी पक्षाला संपवण्याच काम केलं जातं आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच संविधान संपविण्याच काम भाजप करत आहे. हुकुमशाह बनण्याच स्वप्न नरेंद्र मोदींना पडत आहे. यामुळे लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी गोरगरीबांना न्याय देण्यासाठी शरद पवार, उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीची मोठ बांधली. याला कॉग्रेससह सर्वांनी साथ दिली असं मत खासदार विनायक राऊत यांनी व्यक्त केल.


दरम्यान, आमचा दोन वर्षांचा खासदार निधी गोठवला गेला. साडेसात हजार कोटींच विमान पंतप्रधानांनी खरेदी केलं असा आरोप त्यांनी केला. दीपक केसरकर यांनी काजू शेतकऱ्यांना भाव वाढवून दिला नाही. बोंडूचा रस काढण्यासाठी मशिनी फुकट दिल्या. रस काढायला सुरू केल्यावर पोलीस दारात उभे राहीले‌. सेकंड लवासा आंबोलीत उभे राहिलेले बंगले राजकीय पाठिंब्याशिवाय नाही. शरद पवारांशी बेईमानी करून आलेले केसरकर आपल्या तोंडाला पानं पुसणार हे उद्धव ठाकरेंना सांगितले होतं. दुसऱ्यांदा मंत्रीपद मिळालं नाही म्हणून विनायक राऊतांवर आरोप करण्याच काम केलं. एक कोटीचा चेक दिल्यास सांगणाऱ्या केसरकरांनी निवडणूकीच्यावेळी पक्षाकडून निधी मिळाली की नाही हे सावंतवाडीच्या आराध्य दैवतांची शपथ घेऊन सांगाव असं आव्हान त्यांनी दिलं. 


भाजप व गद्दार गटाकडून माझ्यावर टीका होत आहे. होय, मी भजनीबुवा आहे. अभंग गाण, भजन करण पाप नाही. यासाठी भाग्य लागतं. तोंडातून काय बाहेर पडावं हे महत्त्वाचे असतं असं सांगत कणकवलीचे विखारी म्हणत आमदार नितेश राणेंवर नाव न घेता जहरी टीका त्यांनी केली. फुटणाऱ्यांची काळजी करायची नाही. जिल्ह्यात राष्ट्रवादीची ताकद आज दिसत आहे. अजित पवार, दीपक केसरकरांची वाटचाल विसर्जनाकडे सुरू आहे‌.‌ इथल्या आमदारांच्या हातचं, घरचं काही खावू नका असा सल्ला मला हितचिंतकांनी दिला होता. त्याप्रमाणे मी ते पाळले म्हणून आज आपण सोबत आहोत‌ अशी जहरी टीका त्यांनी केसरकरांवर केली.


मोठेपणाची घमेंड आम्हाला नाही. प्रत्येकांच्या सुख दुःखात मी सहभागी होतो. खासदार म्हणून मी आणि तुम्ही यात अंतर नाही. दुजाभाव नाही. ही आघाडी कायम राहील, येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत ती भक्कम असेल असं विधान विनायक राऊत यांनी केले. याप्रसंगी खासदार विनायक राऊत, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या जिल्हाध्यक्ष अमित सामंत, माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, उबाठा शिवसेनेचे संपर्कप्रमुख अरूण दुधवडकर, राष्ट्रवादीच्या कोकण विभाग महिला अध्यक्षा अर्चना घारे-परब, शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते, शिवसेना नेते संदेश पारकर, शिवसेना नेते अतुल रावराणे, बाळा गावडे, राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष अनंत पिळणकर, शिवसेना तालुकाप्रमुख रूपेश राऊळ, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, शहराध्यक्ष देवेंद्र टेमकर, महिला जिल्हाध्यक्षा रेवती राणे, रूची राऊत, सावली पाटकर, बाळ कणयाळकर, हिदायतुल्ला खान, विशाल जाधव आदी उपस्थित होते.