साईबाबांचं नाव घेणाऱ्या केसरकरांना असत्य बोलणं शोभत नाही : विनायक राऊत

Edited by: विनायक गांवस
Published on: February 20, 2024 09:37 AM
views 58  views

सावंतवाडी : निवडणूकीत मदतीसाठी दिलेल्या पक्ष निधीची अंशतः परतफेड करणारा चेक दाखवून मंत्रीपदासाठी पैसे घेतल्याचं भांडवल करत असतील तर गांधी चौकात उघड पंचनामा करावा लागेल असा इशारा खासदार विनायक राऊत यांनी दिला. तर ज्यांनी सर्वकाही दिलं त्या उद्धव ठाकरेंवर घाणेरडे आरोप करणं साईबाबांच नाव घेणाऱ्या केसरकरांना शोभत नाही असही ते म्हणाले.

सावंतवाडी येथील पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले, महाराष्ट्राचे शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर घाणेरडे आरोप केले होते. साईबाबांच नाव घेणाऱ्या केसरकरांना असत्य बोलण शोभत नाही. सावंतवाडीतील उद्धव ठाकरेंच्या सभेला झालेली गर्दी पाहून केसरकर बिथरले. त्यातूनच एक कोटी देऊन मंत्रीपद  घेतल्याच ते बोलले. आमच्याकडे नाही पण काही पक्षात नगरसेवक व्हायला सुद्धा एक कोटी द्यावे लागतात. दीपक केसरकरांना मंत्रीपद दिलं, सगळी खाती दिली त्यांनी खाल्या ताटात घाण करू नये. केसरकर यांची ही वृत्ती दुर्दैवी आहे असा जोरदार हल्लाबोल शिवसेना उबाठा पक्षाचे खासदार विनायक राऊत यांनी केला.

केसरकरांनी आम्हाला मदत केलेली ती विसरणार नाही. आम्ही कृतघ्न नाहीत. पण, मला पाठिंबा देताना गोव्यात काय झालं हे केसरकरांनी सांगायला लावू नये. खुप मोठे ते सज्जन आहेत असं भासवू नये. तिसऱ्या टर्मला आर्थिक स्थिती खालावली आहे. प्रॉपर्टी विकायची आहे असं सांगणाऱ्या मंत्री असणाऱ्या केसरकरांना उद्धव ठाकरेंनी पक्षाकडून मदत केली होती. ही मदत टप्या टप्प्यात परत करणार असल्याचे केसरकर म्हणाले होते. काहीअंशी पक्षनिधी त्यांनी परत केला. हे खोटं असेल तर केसरकरांनी ते जाहीर करावं असं आव्हान दिल. तर त्या निधीचा चेक दाखवून मंत्रीपदासाठी पैसे घेतल्याचं भांडवल करत असतील तर गांधी चौकात उघड पंचनामा करावा लागेल असा टोला खा. राऊत यांनी हाणला. याप्रसंगी जिल्हाप्रमुख संजय पडते, विधानसभा प्रमुख शैलेश परब, तालुकाप्रमुख रूपेश राऊळ, बाळा गावडे, मायकल डिसोझा, चंद्रकांत कासार आदी उपस्थित होते.