विनायक राऊतांची जावेद पाटणकर यांच्या घरी सदिच्छा भेट !

Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: December 05, 2023 16:35 PM
views 535  views

वैभववाडी : सिंधुदुर्ग-रत्नागिरी जिल्हा लोकसभेचे खासदार व शिवसेना नेते  विनायक राऊत यांनी सोमवारी ( ता ४) वैभववाडी तालुका अल्पसंख्याक प्रमुख जावेद पाटणकर यांच्या घरी सदिच्छा भेट दिली.खा.राऊत यांचा पाटणकर कुटुंबाकडून शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

   खा.राऊत सोमवारी वैभववाडी दौऱ्यावर आले होते. त्यांच्या उपस्थितीत उंबर्डे येथे प्रवेश कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी राऊत यांनी पाटणकर कुटुंबीयांची भेट घेतली. त्यांच्यासोबत जिल्हा संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर साहेब, जिल्हा प्रमुख संदेश पारकर , विधानसभा प्रमुख सतीश सावंत , युवासेना जिल्हा प्रमुख सुशांत नाईक,तालुका प्रमुख मंगेश लोके,जिल्हा कार्यकरणी सदस्य संदीप सरवणकर,  उपजिल्हा प्रमुख नंदू शिंदे,दिगंबर पाटील, युवा जिल्हा सरचिटणीस स्वप्नील धुरी, जिल्हा अल्पसंख्यांक अध्यक्ष मज्जीद बटवाले, अल्पसंख्याक जिल्हा सचिव निसार भाई, उपविभाग प्रमुख गौस पाटणकर, गुलजार काझी, पांडुरंग पांचाळ, मयूर दळवी,शाखा प्रमुख रियाज रमदुल ,नौशाद नाचरे, बूथ प्रमुख इम्रान पाटणकर, युवा सेना प्रमुख मुराद रमदुल , सलीम रमदुल, हसन पाटणकर, सलीम पाटणकर , इमाम पाटणकर, मुबारक पाटणकर,हनिफ पाटणकर ,मुस्तफा पाटणकर आदी उपस्थित होते.