
सावंतवाडी : भाजपच्या नावावर पैसा उकळायचा जमिनीचे घोटाळे करून ते पैसे निवडणूकीत वाटण्याचा काहींचा धंदा आहे. तसेच रविंद्र चव्हाण यांनीच विशाल परब यांना निवडणूकीत उभे केल्याची चर्चा आहे असे विधान माजी खासदार विनायक राऊत यांनी केले. तर महाविकास आघाडीत बंडखोरी करणाऱ्यांची हकालपट्टी होते असा नियम आहे. घारेंची झाली नसेल तर शरद पवारांकडे मागणी करू असंही श्री. राऊत यांनी सांगितले.
ते म्हणाले, अर्चना घारे यांना निवडणूकीत उभे करण्यात राणे, केसरकरांचा हात असेल असं विधान राजन तेली यांनी केलं असेल तर तशी शक्यता आहे मला त्याबाबत कल्पना नाही. राजन तेली यांनी आरोप केला असेल तर तो अभ्यासपूर्ण असेल. अर्चना घारे-परब यांनी महाविकास आघाडीत बंडखोरी केली आहे. राज्यात अशी बंडखोरी करणणाऱ्यांची हकालपट्टी करावी हा झालेला निर्णय आहे. हा निर्णय सर्वांना लागू आहे. अर्चना घारे-परब यांची हकालपट्टी झाली नसेल तर शरद पवार यांच्याकडे त्याबाबत आजच लक्ष वेधून मागणी होईल असंही सांगितलं.
दरम्यान, पैसा भाजपच्या नावावर उकळायचा जमिनीचे घोटाळे करून ते पैसू निवडणूकीत वाटण्याचा काहींचा धंदा आहे. रविंद्र चव्हाण यांनीच विशाल परब यांना उभे केल्याची चर्चा आहे असे विधान देवेंद्र फडणवीस व विशाल परब यांच्या व्हायरल फोन कॉलवर भाष्य करताना माजी खासदार विनायक राऊत यांनी केलं. यावेळी विधानसभा प्रमुख रूपेश राऊळ, माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले आदी उपस्थित होते.