
देवगड : देवगड तालुक्यातील तिर्लोट ठाकूरवाडी येथील युवा कार्यकर्त्यांनी माजी खासदार विनायक राऊत, संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, जिल्हा प्रमुख संदेश पारकर, शिवसेना नेते अतुल रावराणे, युवासेना अध्यक्ष सुशांत नाईक, शिवसेना व युवा सेना पदाधिकारी यांच्या उपस्थितीत महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या ६३ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.
यात प्रमुख्याने शहारूख ठाकूर, मुसब ठाकूर, निहाल दादन, मुबारक ठाकूर,अब्दुल रहिमान ठाकूर यांच्यासमवेत अन्य कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. त्यांचे माजी खासदार विनायक राऊत यांनी उबाठा शिवसेनेत स्वागत केले.