
वैभववाडी : रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांच्या प्रचाराचा खांबाळे येथे शुभारंभ करण्यात आला. येथील श्री आदीष्टी देवालय येथे प्रचाराचा नारळ फोडण्यात आला. यानंतर गावातील प्रत्येक घरामध्ये उमेदवाराची माहिती पत्रके वाटप करण्यात आली.
विनायक राऊत यांच्या प्रचाराचा खांबाळे गावात आज शुभारंभ झाला.सकाळी आदिष्टी मंदिरातून याला प्रारंभ झाला. यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख मंगेश लोके, उपसरपंच गणेश पवार, सोसायटी चेअरमन प्रविण गायकवाड, तंटामुक्त समिती अध्यक्ष दीपक चव्हाण, संजय पवार, अशोक पवार, आनंद पवार, शांताराम कदम, सुनील पवार, माजी सरपंच संजय साळुंखे, सुनील गुरव, रामचंद्र गुरव, भगवान मोहिते, सज्जन मोहिते, तुकाराम वापिलकर, भास्कर मोहीते, योगेश पवार, बाबाजी देसाई, गंगाराम अडुळकर, मारुती परब, सत्यवान कर्पे, सखाराम माळकर, अमोल चव्हाण, योगेश मनोहर पवार, संकेश पवार, अमित कर्पे, बळिराम सावंत, सत्यवान रघुनाथ मोहिते, दीपक वसंत पवार, दीपक सोमा पवार, नारायण पवार, जयवंत मोहिते, रामदास माळकर, कमलाकर चव्हाण, तुषार चव्हाण, बुधाजी गुरव, कमलेश पवार, अशोक दत्ताराम पवार, रमेश पवार, दिनेश पालकर, प्रशांत गुरव, लक्ष्मीबाई सुतार, जयेश पवार, रमाकांत पवार, प्रकाश लांजवळ, बाळाराम सुतार आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.