वैभववाडीत विनायक राऊत यांची आज प्रचार सभा !

उपनेत्या संजना घाडी राहणार उपस्थित
Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: April 24, 2024 08:09 AM
views 266  views

वैभववाडी : महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांची प्रचारसभा आज सायंकाळी ३.३०वा शहरातील दत्त मंदिरनजीक मैदानावर होत आहे. शिवसेनेच्या उपनेत्या संजना घाडी या उपस्थित राहणार आहेत.

   खा.राऊत यांच्या प्रचाराची दुसरी फेरी सुरू झाली आहे. पहिल्या फेरीतील खळा बैठकीनंतर आता जाहीर व कार्नर सभा सुरू झाल्या आहेत. आज वैभववाडीतही जाहीर सभा होत आहे. या सभेला खा.विनायक राऊत, शिवसेना नेते, उपनेते अरुणभाई दूधवडकर, संजना घाडी, जान्हवी सावंत, आमदार वैभव नाईक, सतीश सावंत, अतुल रावराणे, सुशांत नाईक आदी उपस्थित राहणार आहेत. तालुक्यातील महाविकास आघाडीच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन तालुका प्रमुख मंगेश लोके यांनी केले आहे.