विनायक राऊतांच्या रूपाने 'मविआ'चा विजय निश्चित : अर्चना घारे

Edited by: विनायक गावस
Published on: March 22, 2024 08:13 AM
views 171  views

सावंतवाडी : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या पदाधिकारी बैठकीत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांना तिसऱ्यांदा निवडून आणण्याचा एकमुखी ठराव घेण्यात आला.

याप्रसंगी राष्ट्रवादीच्या कोकण विभाग महिला अध्यक्षा अर्चना घारे-परब म्हणाल्या, रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे खासदार विनायक राऊत विजयाची हॅट्रिक करतील. त्यामुळेच खा. राऊतांसमोर पराभूत होणारा उमेदवार अजून ठरत नाही‌‌. विरोधकांना उमेदवार सापडत नाही आहेत. महाविकास आघाडीची ताकद मोठी आहे त्यामुळे आपला विजय निश्चित आहे. 'महाशक्ती'ला हरवायला अन्  लोकशाही टीकवायला आपण एकत्र आलो आहोत. फोडा आणि राज्य करा ही वृत्ती देशात टीकता नये यासाठी इंडिया आघाडीच सरकार देशात आलं पाहिजे. त्यासाठी खा. राऊत यांना निवडून आणल पाहिजे. सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातून मोठं मताधिक्य त्यांच्यामागे आम्ही उभं करू असा विश्वास अर्चना घारे-परब यांनी व्यक्त केला.

याप्रसंगी खासदार विनायक राऊत, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या जिल्हाध्यक्ष अमित सामंत, माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, उबाठा शिवसेनेचे संपर्कप्रमुख अरूण दुधवडकर, राष्ट्रवादीच्या कोकण विभाग महिला अध्यक्षा अर्चना घारे-परब, शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते, शिवसेना नेते संदेश पारकर, शिवसेना नेते अतुल रावराणे, बाळा गावडे, राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष अनंत पिळणकर, शिवसेना तालुकाप्रमुख रूपेश राऊळ, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, शहराध्यक्ष देवेंद्र टेमकर, महिला जिल्हाध्यक्षा रेवती राणे, रूची राऊत, सावली पाटकर, बाळ कणयाळकर, हिदायतुल्ला खान, विशाल जाधव आदी उपस्थित होते.