विमलेश TVS शोरूमचं नवीन जागेत स्थलांतरण...!

Edited by: नागेश दुखंडे
Published on: November 10, 2023 19:51 PM
views 115  views

देवगड : देवगड येथील विमलेश टीव्हीएस शोरूम चे नवीन जागेत स्थलांतरण करण्यात आले. देवगड खरेदी विक्री संघ नजीकच्या जागेत झालेल्या या स्थलांतरण सोहळ्याचा शुभारंभ माजी आमदार अजित गोगटे यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी खरेदी विक्री संघाचे माजी संचालक संतोष किंजवडेकर, माजी जि प सदस्य रेश्मा जोशी, नगरसेवक नितीन बांदेकर,जिल्हा अधिकृत विक्रेता (TVS) सचिन राव, सामाजिक कार्यकर्ते मिलिंद कुबल, व अन्य अनेक जण उपस्थित होते.

नव्या शोरूमचा शुभारंभ आमदार अजित गोगटे यांनी केला. यावेळी दीप प्रजननही करण्यात आले या सर्वांचे स्वागत या शोरूमचे मालक प्रशांत मालाडकर यांनी केले फ्रेंड सर्कल संस्थेसह अनेक नागरिकांनी भेटून प्रशांत मालाडकर यांना शुभेच्छा दिल्या.