
सिंधुदुर्गनगरी : जिल्हा रुग्णालय सिंधुदुर्ग येथे वैद्यकीय महाविद्यालय झाल्याने.जिल्हा रुग्णालय या ठिकाणाहून हलवावे लागणार आहे.हे रुग्णालय सावंतवाडी तसेच कुडाळ येथे व्हावे अशी मागणी तेथील ग्रामस्तंमधून होत आहे.त्या मुळे हे रुग्णालय सिंधुदुर्गनगरी येथून हलू नये यासाठी बुधवारी ओरोस दशक्रोशितील ग्रामस्थांनी ओरोस गावचे ग्रामदैवत श्री रवळनाथ मंदिर येथे सभा घेत.काहीही झाले तरी जिल्हा रुग्णालय या ठिकाणाहून दुसरीकडे जाऊ देणार नाही.अशी भूमिका घेतली. सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालय सुरू झाल्यापासून गेली सुमारे ३० वर्ष सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या मुख्यालय ठिकाणी आहे.हे ठिकाण पूर्ण जिल्ह्याला मध्यवर्ती आहे.मात्र या ठिकाणी आता वैद्यकीय महाविद्यालय झाल्याने हे रुग्णालय इतरत्र हलवावे लागणार आहे.त्या साठी प्राधिकरण क्षेत्रातील जागा मागण्यात आली आहे.
असे असतानाच हे रुग्णालय सावंतवाडी येथे यावे अशी मागणी तेथील नागरिकांनी केली.तर कुडाळ येथे व्हावे यासाठी कुडाळ वासियांनी मागणी केली आहे.या पार्श्वभूमीवर आज ओरोस दशक्रोशितिल नागरिक व सर्व पक्षीय ओरोस येथील श्री रवळनाथ मंदिर येथे मोठ्या संख्येने एकत्र झाले. या वेळी उपस्थितांनी हे रुग्णालय येथून कुठेही हलवू देणार नाही.या साठी कितीही संघर्ष करावा लागला तरी चालेल.अशी एकत्रित भूमिका घेतली.तसेच या वेळी जिल्हा रुग्णालय बचाव समिती गठीत करून गुरुवारी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांची भेट घेण्याचे.तसेच जर ३० सप्टेंबर रोजी कुडाळ वासियानी जिल्हा रुग्णालय कुडाळ मध्ये व्हावे यासाठी आंदोलन केले तर त्या विरोधात त्याचदिवशी आंदोलन करण्याची भूमिका घेतली आहे.