
दोडामार्ग : दोडामार्ग तालुक्यात दिवसेंदिवस विजेचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. गेले कित्तेक दिवस कळणे पंचक्रोशीत विजेचा लपंडाव सुरु असून इथले ग्रामस्थ संतापलेले आहेत. शनिवारी विजवितरणचे सासोली स्पस्टेशन चे अधिकारी नायर यांना कळणे ग्रामस्थांनी धारेवर धरतं प्रश्नाची सरबत्ती केली. उपस्थित अधिकारी नायर म्हणाले की आठ दिवसात 90 टक्के कळणे भागातील विजेचा प्रश्न सुटणार आहे. काही ठिकाणी काम सुरु आहे ते पूर्ण झाल्यावर वीज सुरळीत होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
पावसाळा सुरु होण्या पूर्वी कळणे परिसरातील विद्युत लाईनवरील झाडे साफ करून विद्युत पुरवठा सुरळीत करा अशी कळणे वासियांनी मागणी करून देखील विज विभागाने याकडे दुर्लक्ष केला. आता पावसाळा सुरु झाला आणि कळणे परिसरात विजेचा खेळ खंडोबा सुरु झाला यामुळे इथले नागरिक त्रस्त झाले. याबाबत दोडामार्ग विजवितरणच्या कार्यालयात शनिवारी घेराव घालण्या संदर्भात ग्रामस्थांनी ठरविले होते. मात्र शनिवार सुट्टीचा दिवस असल्याने सासोळी सब स्टेशन चे अधिकारी नायर यांना ग्रामस्थांनी संपर्क केला. यावेळी नायर यांनी तुम्ही ग्रामरस्थ इकडे येऊ नकी मी कळण्या मध्ये येतो असे सांगून नायर कळणे गावात गेले. यावेळी सरपंच
सरपंच अजित देसाई, एकनाथ नाडकर्णी, तंटामुक्ती अध्यक्ष संजय देसाई, लक्ष्मण देसाई, पुरुषोत्तम देसाई, योगेश देसाई, उत्तम देसाई, श्रीनिवास देसाई, प्रभाकर देसाई, प्रियेश देसाई, ब्रिजेश नाईक, अरुण परब, लवू देसाई, माजी सरपंच आनंद देसाई, निलेश परब, लकी देसाई, बाबा शिंदे, सुनिल नार्वेकर, विलास गवस, अरुण परब, श्रीमती अपर्णा सावळ व इतर आदी ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी नायर यांना चांगलेच फैलावर घेतले व कित्तेक दिवस कळणे परिसरात विजेचा समस्या वाढत आहेत तुमचे अधिकार कर्मचारी फोन उचलत नाही. विजेचा प्रश्न सोडवणार कोण? असे अनेक प्रश्न उपस्थित करून त्यांना धारेवर धरले यावेळी सासोली व आदी ठिकाणी काही किरकोळ काम सुरु आहे ते आठ दिवसात पूर्ण होणार असून आठ दिवसात तुमच्या परिसरातील 90 टक्के विजेचा प्रश्न सुटणार असल्याचे त्यांनी सांगितले.