निगुडे जुनी देऊळवाडी रस्त्यासाठी ग्रामस्थ आक्रमक...!

Edited by:
Published on: March 11, 2024 06:44 AM
views 242  views

सावंतवाडी : निगुडे जुनी देऊळवाडी विहिरीपर्यंत रस्ता मजबुतीकरण करणे काम जिल्हा वार्षिक योजना सन २०२२/२०२३  जनसुविधा अंतर्गत मंजूर असून सदर रस्त्याचे काम अद्याप सुरू नसून यासाठी आज निगुडे जुनी देऊळवाडीतील ग्रामस्थ उपोषणाला  बसले आहेत. पंचायत समिती कार्यालयासमोर हे उपोषण सुरु आहे.

निगुडे देवळीवाडी विहिरीपर्यंत रस्ता मजबुतीकरण करणे काम जिल्हा वार्षिक योजना सन २२/२३ जनसुविधा अंतर्गत मंजूर असून सदर रस्त्याचे काम ठेकेदाराकडून अद्याप पर्यंत चालू करण्यात आलेले नाही. सदर रस्ता वाहतुकीस पूर्णपणे अयोग्य आहे त्यामुळे वाडीतील गरोदर महिला, वयोवृद्ध नागरीक, शाळकरी मुले, यांना रस्त्यावरून प्रवास करत असताना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. सदरचा निधी खर्च करण्याची अंतिम मुदत ३१ मार्च २०२४ पर्यंत असून मुदतीत निधी खर्च न झाल्यास तो निधी परतून जाण्याची शक्यता आहे. 

या उपोषणास गुरुदास निगुडकर,माजी सरपंच ग्रामपंचायत सदस्य समीर गावडे, माजी  सरपंच शांताराम गावडे, माजी उपसरपंच गुरुदास गवंडे, ग्रामपंचायत सदस्य वर्षा निगुडकर, माजी ग्रामपंचायत सदस्य महेश सावंत,  योगेश केणी ग्रामपंचायत सदस्य रोणापाल, हनुमंत सावंत, विनया नाईक, कृष्णा निगुडकर, श्रीराम सावंत, गंधाली निगुडकर, महेश निगुडकर, सिद्धेश निगुडकर, सुभाष निगुडकर, अनंत निगुडकर, शुभांगी निगुडकर, मेघा सावंत, सुहासिनी निगुडकर, शशिकांत निगुडकर, वसंत निगुडकर, शुभांगी निगुडकर, आदिती आरोसकर, पार्वती  सावंत, विनायक नाईक, शंकर सावंत, तुळशीदास गवंडे, अंकुश निगुडकर, प्रभाकर सावंत, दीपक निगुडकर, नितीन निगुडकर, महादेव सावंत, देविदास निगुडकर, दिपाली निगुडकर, शिवदास निगुडकर, शुभांगी सुभाष निगुडकर, प्रभाकर सावंत, महादेव सावंत, आदी निगुडे देवळीवाडी ग्रामस्थ  उपस्थिती होते.