गावचा सत्तासंघर्ष | सिंधुदुर्ग जिल्ह्यात सरपंचपदासाठी 1149 तर सदस्यपदासाठी 5517 अर्ज दाखल

निम्म्याहुन अधिक अर्ज शेवटच्या दिवशी
Edited by: प्रतिनिधी
Published on: December 03, 2022 10:12 AM
views 290  views

सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यातील ३२५ ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्र दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी सरपंच पदासाठी ६९७ तर सदस्य पदासाठी ३५१८ नामनिर्देशन पत्र  दाखल झाली. आज अखेर एकूण सरपंचपदासाठी ११४९ तर सदस्यपदासाठी ५५१७ नामनिर्देशन पत्र दाखल झाल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातील सामान्य शाखेकडून देण्यात आली.

तालुकानिहाय एकूण दाखल नामनिर्देशन पत्र पुढीलप्रमाणे :

कणकवली - ग्रामपंचायत संख्या ५८, सरपंच पदासाठी १४९, सदस्य पदासाठी ७३९,आज अखेर एकूण सरपंचपदासाठी २२३,सदस्य पदासाठी ११०४. वैभववाडी - ग्रामपंचायत संख्या १७, सरपंच पदासाठी ३१, सदस्य पदासाठी १४१,आज अखेर एकूण सरपंचपदासाठी ४७, सदस्य पदासाठी २१२. देवगड - ग्रामपंचायत संख्या ३८, सरपंच पदासाठी ५६, सदस्य पदासाठी २६३, आज अखेर एकूण सरपंचपदासाठी ११०, सदस्य पदासाठी ५००. मालवण - ग्रामपंचायत संख्या ५५, सरपंच पदासाठी १२६, सदस्य पदासाठी ६०८,आज अखेर एकूण सरपंचपदासाठी १८२, सदस्य पदासाठी ८४८. कुडाळ - ग्रामपंचायत संख्या ५४, सरपंच पदासाठी १०५, सदस्य पदासाठी ६८७, आज अखेर एकूण सरपंचपदासाठी १९६, सदस्य पदासाठी १०७३. सावंतवाडी- ग्रामपंचायत संख्या ५२,  सरपंचपदासाठी १२५, सदस्य पदासाठी ६१४,आज अखेर  सरपंचपदासाठी एकूण १९३, सदस्य पदासाठी ९१० . वेंगुर्ला- ग्रामपंचायत संख्या २३, सरपंच पदासाठी ५८, सदस्य पदासाठी २४५, आज अखेर एकूण सरपंचपदासाठी १०४, सदस्य पदासाठी ४८४. दोडामार्ग - ग्रामपंचायत संख्या २८, सरपंच पदासाठी ४७, सदस्य पदासाठी २२१, आज अखेर एकूण सरपंचपदासाठी ९४, सदस्य पदासाठी ३८६.