न्हावेलीत १७ ला नवरात्रौत्सवानिमित्त गावमर्यादित भजन स्पर्धा

Edited by: विनायक गावस
Published on: October 15, 2023 14:10 PM
views 96  views

सावंतवाडी : न्हावेली येथील श्री देवी माऊली मंदिरात नवरात्रौत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.यानिमित्त मंगळवार १७ ॲाक्टोंबर रोजी न्हावेली गावमर्यादित भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

प्रथम पारितोषिक ५००० हजार रुपये, द्वितीय ३००० रुपये, तृतीय १००० रुपये तसेच उकृष्ट गायक, पखवाज, तबला, झांज,कोरस,शिस्तबद्ध मंडळ अशी बक्षिसे ठेवण्यात आली आहे .बुधवार १८ रोजी श्री माऊली बाल गोपाळ मित्रमंडळ,न्हावेली आयोजित सकाळी १० वाजता श्रीसत्यनारायण महापूजा तीर्थप्रसाद व महाप्रसाद, त्यानंतर रात्री ८ वाजता जय हनुमान दशावतार नाट्यमंडळ, दांडेली आरोस यांचा नाट्यप्रयोग होणार आहे. तरी सर्वानी याचा लाभ घ्यावा असं आवाहन केलं आहे.