तांबळडेग येथील ग्रा. पं.सदस्याकडून शिवीगाळ - मारण्याची धमकी

Edited by: नागेश दुखंडे
Published on: April 21, 2024 11:06 AM
views 168  views

देवगड : देवगड येथील तांबळडेग  ग्रामपंचायत ग्रामसभेतील बाचाबाची नंतर महीला ग्रा.पं.सदस्याला शीवीगाळ करून मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी महीला ग्रा.पं.सदस्यांनी दिलेल्या तक्रारीवरून तांबळडेग ग्रा.पं.सदस्य सहदेव काशीनाथ कोचरेकर(४८)रा.तांबळडेग यांच्याविरूध्द देवगड पोल{स स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही घटना शुक्रवारी सायंकाळी ५.३० वा.सुमारास तांबळडेग ग्रा.पं.कार्यालय परिसरात घडली.

याबाबत पोलीसांनी दिलेल्या माहीतीनुसार, तांबळडेग ग्रा.पं.ची शुक्रवार दि. १९ एप्रिल रोजी सायंकाळी ४.३० वाजता सभा आयोजीत करण्यात आली होती.या सभेमध्ये ग्रा.पं.सदस्य सहदेव कोचरेकर यांची महीला ग्रा.पं.सदस्याबरोबर बाचाबाची झाली.सभा संपल्यानंतर सायंकाळी ५.३० वा.सुमारास ग्रामपंचायत कार्यालयातुन बाहेर पडताना ग्रा.पं.आवारातच सदस्य सहदेव कोचरेकर यांनी बाचाबाची झालेल्या महीला ग्रा.पं.सदस्याला शीवीगाळ करून मारण्याची धमकी दिली तसेच मनात लज्जा न{र्माण होईल असे वर्तन केले याबाबत त्या महीला सदस्यांनी देवगड पोलीस स्थानकात दिलेल्या तक्रारीवरून पोलीसांनी ग्रा.पं.सदस्य सहदेव कोचरेकर यांच्याविरूध्द भादवी ३५४, ३५४ बी, ३५२, ३२३, ५०४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.या प्रकरणाचा अधिक तपास महींला पो.हे.कॉ.वनिता पडवळ करत आहेत.