विलवडे राजा शिवाजी विद्यालयाचा निकाल १०० टक्के

Edited by:
Published on: May 13, 2025 18:18 PM
views 24  views

सावंतवाडी : विलवडे येथील राजा शिवाजी विद्यालयाचा शालांत प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल १०० टक्के लागला. या परीक्षेला बसलेले सर्व ३८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यात विशेष श्रेणीत २१, प्रथम श्रेणीत १३ तर तृतीय श्रेणीत ४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. या शाळेतून प्रथम क्रमांक संचिता किशोर गवस ९५.२० %, द्वितीय क्रमांक ओम विजय परब ९४ %,  तृतीय क्रमांक श्रेयस रावजी दळवी ८८.६०% हिने पटकाविला. यशस्वी विद्यार्थ्यांचे विलवडे ग्रामोन्नती मंडळ (मुंबई) अध्यक्ष संभाजी दळवी, उपाध्यक्ष दिलीप दळवी, सचिव सूर्यकांत दळवी, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष प्रफुल्ल सावंत मुख्याध्यापक बुध्दभूषण हेवाळकर व शिक्षक कर्मचाऱ्यांनी यांनी अभिनंदन केले आहे.