
सावंतवाडी : सावंतवाडीची शान असलेली अर्बन बँक आज विलिन झाली. आता सावंतवाडी कंझ्युमर्स को. सो. लिमिटेड कधी होणार असा उपरोधिक सवाल माजी नगरसेवक विलास जाधव यांनी केला. ७८ वर्ष सेवा देणाऱ्या अर्बन बँकच्या विलीनीकरणानंतर त्यांनी हे टीकास्त्र सोडलं. तसेच किंगमेकर सहीत सर्व संचलकांचे अभिनंदन करत असल्याचेही ते म्हणाले. विलीनीकरणानंतर सावंतवाडी कंझ्युमर्स सोसायटीवरून त्यांनी टोला हाणला.