
वेंगुर्ला : वेंगुर्ला तालुका काँग्रेस कमिटीची सभा शनिवारी (२७ जुलै) शिरोडा येथील डोना-डवली (ताराई) हॉटेल येथे संपन्न झाली. या सभेमध्ये सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ महविकास आघाडी कडून काँग्रेसला मिळावा तसेच काँग्रेसकडून जिल्हा कार्याध्यक्ष विलास गावडे याना उमेदवारी मिळावी, असा एकमताने ठराव घेण्यात आला. तसेच या सभेत नवीन मतदार नाव नोंदणी बाबत आढावा, सरकार विरोधात मागील तीन महिन्यातील व पुढे होणाऱ्या आंदोलना बाबत आढावा व पुढील नियोजन, सोशल इंजिनिअरिंग, बुथ कमिटी व बी.एल.ए. बाबत आढावा घेण्यात आला. यावेळी आसोली ग्राम कमिटी अध्यक्षपदी अमोल राऊळ यांची निवड करण्यात आली. तर प्रदेश काँग्रेसच्या आदेशानुसार विविध विषयांवर चर्चा झाली.
या सभेला जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख, कार्याध्यक्ष विलास गावडे, पक्ष निरीक्षक विजय प्रभू, तालुकाध्यक्ष विधाता सावंत, युवक काँग्रेस कार्याध्यक्ष सिद्धेश परब, सामाजिक न्याय विभाग सेल अध्यक्ष अजिंक्य गावडे, माजी पंचायत समिती सभापती जगन्नाथ डोंगरे, अनुसूचित सेल चे जिल्हा अध्यक्ष उत्तम चव्हाण, आरवली माजी सरपंच मयूर आरोलकर, माजी महिला अध्यक्ष चित्रा कनयाळकर, प्रथमेश परब, अभिजित राणे, कृष्णा आचरेकर, अमोल राऊळ, सावळाराम गोडकर, प्रथमेश हुनारी, योगिता मसूरकर, प्रेरणा लुडबे, अनिष्का गोडकर, अब्दुल शेख, अंकुश शेट्ये, आत्माराम सोकटे, सोशल मीडिया जिल्हा अध्यक्ष केतनकुमार गावडे, तसेच तालुका पदाधिकारी, सदस्य कार्यकर्ते उपस्थित होते.