मातोश्री कला क्रीडा मंडळ नवरात्रौत्सव अध्यक्षपदी विलास गावडे

उपाध्यक्षपदी उपेंद्र तोटकेकर
Edited by: दिपेश परब
Published on: October 09, 2023 11:03 AM
views 156  views

वेंगुर्ले : मातोश्री कला क्रीडा मंडळ , दाभोलीनाका - वेंगुर्ले ची नवरात्रौत्सव नियोजनाची बैठक मंडळाचे अध्यक्ष विष्णुदास उर्फ दादा कुबल यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली . यावेळी सन २०२३ च्या नवरात्रौत्सव कमिटी अध्यक्षपदी उद्योजक विलास गावडे व उपाध्यक्षपदी उपेंद्र तोटकेकर यांची निवड सर्वानुमते करण्यात आली.

सलग २८ वर्षं हा नवरात्रौत्सव दाभोलीनाका येथे विविध सांस्कृतिक कार्यक्रम, सामाजिक उपक्रम व स्पर्धा आयोजित करून करण्यात येतो . वेंगुर्ले तालुक्यातील सर्वात पहिल्या नवरात्रौत्सवाची सुरुवात याठिकाणी करण्यात आल्यामुळे वेंगुर्ले तालुक्यातील तसेच जिल्ह्यातील विविध पक्षांचे नेते मंडळी व प्रतिष्ठित नागरिक या नवरात्रौत्सवाला भेट देतात . ह्यावर्षीही या नवरात्रौत्सवात रेकॉर्ड डान्स स्पर्धा , वेशभूषा स्पर्धा , दशावतारी नाटक , आॅक्रेस्टा , महिलांसाठी फुगडी , विनोदी नाटक , दांडीया असा नऊ दिवसांच्या भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

दाभोलीनाका येथील कार्यालयात आलेल्या बैठकीत प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई , सुहास गवंडळकर , वसंत तांडेल , जयंत मोंडकर , प्रभाकर आजगावकर , संदेश निकम , श्रीकांत रानडे , राघवेंद्र जोशी , शरद मेस्त्री , प्रमोद वेर्णेकर , तुषार साळगांवकर , अविनाश सडवेलकर , भुषण आंगचेकर , भुषण सारंग , हेमंत गावडे , प्रफुल्ल प्रभु , तन्मय जोशी , राहुल मडकईकर , विधाता सावंत , प्रकाश डिचोलकर , दादा केळुसकर , नामदेव सरमळकर , गौरेश वायंगणकर , मारुती दोडशानट्टी , अनंत मिंडे , प्रसाद मांजरेकर , प्रसाद केरकर , ऋत्विक आंगचेकर , गिरगोल फर्नांडीस , भानुदास मांजरेकर , शशी करंगुटकर इत्यादी मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते .