
सावंतवाडी : वेत्ये कलेश्वर पूर्वी देवी युवा कला क्रीडा मंडळातर्फे आयोजित करण्यात आलेल्या खुल्या नरकासुर स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. सरपंच गुणाजी गावडे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडणार आहे. ही स्पर्धा कलेश्वर पूर्वी देवी मंदिर प्रांगणात रात्री ८:३० वा. आयोजित करण्यात आली आहे.
या स्पर्धेत सहभागी होणाऱ्यांसाठी आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. प्रथम पारितोषिक ११,१११ रुपये, द्वितीय ७,७७७ रुपये, तृतीय ५,५५५ रुपये तर उत्तेजनार्थ २,२२२ रुपये असे बक्षिसांचे वितरण करण्यात येणार आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी प्रवेश विनामूल्य आहे.










