
कणकवली : कणकवली नगरपंचायतीच्या नव्या बॉडीची पहिलीच सर्वसाधारण सभा बुधवारी न पंचा सभागृहात पार पडली पहिल्या सभेत सत्ताधारी व विरोधक यांच्यात अनेक मुद्द्यांवरून वादावादी झाली. यामध्ये दिव्यांग बांधवांचा निधी मसुरकर की नही रस्ता कचरा सफाईसाठी कर्मचारी वेळेत उपलब्ध न होणे अशा अनेक मुद्द्यांवर सत्ताधारी व विरोधक यांच्यात खडाजंगी पाहायला मिळाली.
नगराध्यक्ष संदेश पारकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेला उपनगराध्यक्ष सुशांत नाईक मुख्याधिकारी गौरी पाटील नगरसेवक रुपेश नार्वेकर संजय कामतेकर बंडू हरणे राकेश राणे स्वप्निल राणे संकेत नाईक जयेश धुमाळे लोकेश कांबळे बाळू पारकर, नगरसेविका मेघा गांगण सुप्रिया नलावडे जाई मूरकर प्रतीक्षा सावंत सुमेधा अंधारी आर्या राणी मेघा सावंत दीपिका जाधव मनस्वी ठाणेकर उपस्थित होते.











