12 th RESULT ; वेंगुर्लेचा निकाल ९९.६३ टक्के

सारिकाकुमारी यादव प्रथम
Edited by:
Published on: May 25, 2023 21:29 PM
views 106  views

वेंगुर्ले : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा वेंगुर्ले तालुक्याचा निकाल ९९.६३ टक्के लागला. संपुर्ण तालुक्यात बारावी परीक्षेला बसलेल्या ८२७ विद्यार्थ्यांपैकी ८२४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.

  बॅ बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालयाच्या विज्ञान शाखेच्या सारिकाकुमारी सरोज यादव हिने ५५१ गुण (९१.८३ टक्के) मिळवून तालुक्यात प्रथम येण्याचा मान मिळवला. तर वेतोरे हायस्कूलच्या विज्ञान शाखेच्या सिद्धी शिवानंद भिडे हिने ५३८ गुण (८९.६७ टक्के) गुण मिळवून द्वितीय


व अ. वि. बावडेकर शिरोडा महाविद्यालयाच्या किमान कौशल्य शाखेच्या ऋतुजा शैलेश उगवेकर हिने ५३६ गुण (८९.३३ टक्के) गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकावले.

सेच तालुक्यात  श्री. देवी सातेरी हायस्कूल व कै. सौ. गुलाबताई दीनानाथ नाईक कनिष्ठ महाविद्यालय वेतोरे व शिरोडा बा. म. गोगटे कनिष्ठ महाविद्यालय व तांत्रिक संकुल या महाविद्यालयांचा निकाल १०० टक्के लागला.