
वेंगुर्ले : महाराष्ट्रामध्ये गोवंश जनावरांची कत्तल करण्यास बंदी असताना देखील गोवंश जातीच्या जनावरांचे कत्तल केलेले २५ किलो मांस दि. १५ मे रोजी सायंकाळी ८ वाजण्याच्या सुमारांस ग्रामस्थांनी पाठलाग केल्याने धाकोरे येथील काजूच्या बागेत टाकून सावंतवाडी येथील संशयित आरोपी फरार झाला या प्रकरणी वेंगुर्ले पोलीसांत सावंतवाडी येथील सरफराज नामक व्यक्तीवर गुन्हा दाखल झाला आहे.
महाराष्ट्रामध्ये गोवंश जनावरांची कत्तल करण्यास बंदी असताना देखील गोवंश जातीच्या जनावरांचे कत्तल केलेले मांस जनतेचे आरोग्यास धोका निर्माण होईल असे माहीत असताना देखील गोवंश म्हणजे काय जनावरांची कत्तल केलेले २५ किलो वजनाचे गोमांस सावंतवाडी येथून दि. १५ रोजी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारांस विक्रीकरिता स्वतःच्या ताब्यात बाळगून दुचाकी गाडीवरून गोमांस घेऊन धोकारे रस्त्यावरून आजगांव दिशेने जात असताना ग्रामस्थांनी पाठलाग केल्यामुळे उदय कृष्णा मुळीक राहणार धाकोरे यांचे काजूच्या बागेत सदर गोमास टाकून पळून गेला. या प्रकरणी ग्रामस्थांनी पोलीसांत तात्काळ खबर दिली. वेंगुर्ले पोलीस स्टेशनच्या महिला काँस्टेबल दिपिका मठकर या तात्काळ ग्रामस्थांच्या तक्रारी नुसार घटनास्थळी दाखल झाल्या. मात्र सावंतवारी येथील संशयित सरफराज नामक आरोपी हा फरार झाला. या प्रकरणी आरोपीवर भारतीय दंड संहिता कलम ३२५, २७१ महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम १९७६ चे कलम ५ (c), 9 (A) प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस निरीक्षक' निसर्ग ओतारी यांच्या मार्गदर्शनाखाली शिरोडा बीटचे ठाणे अंमलदार प्रसाद कदम हे अधिक तपास करीत आहेत.










