आम. दीपक केसरकर यांच्या माध्यमातून वेंगुर्ले पंचायत समितीला ६ संगणक संच प्रदान

Edited by: दिपेश परब
Published on: March 13, 2026 19:34 PM
views 65  views

वेंगुर्ले : आमदार दीपक केसरकर यांच्या माध्यमातून व आमदार निधीतुन वेंगुर्ले पंचायत समितीच्या ग्रामीण पाणी पुरवठा उपविभाग कार्यालयाकरिता ३ संगणक, ३ प्रिंटर व १ स्कॅनर तर जिल्हा परिषद बांधकाम विभाग वेंगुर्ले कार्यालया करीता ३ संगणक, ३ प्रिंटरचा पुरवठा केला आहे.  

दरम्यान आज १३ मार्च रोजी पंचायत समिती वेंगुर्ले सभापती शंकर घारे, उपसभापती सचिन देसाई, पंचायत समिती सदस्य तथा गटनेते विष्णु  फणसेकर, सुचिता वजराटकर यांच्या हस्ते व सदस्य शितल राऊत, नितीन मांजरेकर, साक्षी नार्वेकर, संकेत धुरी, प्रियांका घाटवळ, सुमती परब या मान्यवरांच्या उपस्थितीत या संगणकांचे उदघाटन करण्यात आले.  यावेळी ग्रामीण पाणी पुरवठा उप विभागातील तसेच जिल्हा परिषद बांधकाम विभागातील सर्व अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. आमदार निधीमधुन सदरचे संगणक व इतर साहीत्य मंजुर केल्यामुळे कार्यालयीन कामकाज सुलभ झालेले आहे. तसेच  इ-ऑफीसचे कार्यालयीन कामकाज अत्यंत सुलभ सुरळीत सुरु झालले आहे. यामुळे सर्व अधिकाऱ्यांनी आमदार दीपक केसरकर यांचे आभार व्यक्त केले.