
वेंगुर्ले : वेंगुर्ला रेडी येथे सरपंच चषक २०२६ या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या भव्य टेनिस बोल क्रीडा महोत्सवाला कुडाळ मालवणचे आमदार निलेश राणे यांनी सदिच्छा भेट देत खेळाडूंचा उत्साह वाढवला. तसेच थरारक क्रिकेट सामन्यांचा मनमुराद आनंद लुटला.

यावेळी सरपंच रामसिंग राणे व रेडी क्रिकेट मंडळाच्या वतीने आमदार निलेश राणे यांचा सन्मान करण्यात आला. तर नवनिर्वाचित जि प सदस्य प्रितेश राऊळ व पंचायत समिती सदस्य प्रियांका घाटवळ यांचा आमदार राणे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब, नवनिर्वाचित जि प सदस्य दादा साईल, जिल्हा बँक संचालक विद्याधर परब, सरपंच रामसिंग राणे, कौशिक परब, सागर राणे, अण्णा गडेकर, तुषार साळगावकर, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ व असंख्य क्रीडा रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान यावेळी रेडी जिल्हा परिषद मधून सिंधुदुर्ग जिल्हापरिषदचे मानाचे पद ह्या मतदारसंघात मिळावे अशी प्रामुख्याने मागणी ग्रामस्थमधून करण्यात आली.










