रोटरी क्लब ऑफ वेंगुर्ला मार्फत उभादांडा सागरेश्वर समुद्रकिनारी उभारला जाणार रेस्क्यू टॉवर

Edited by: दिपेश परब
Published on: February 20, 2026 20:50 PM
views 21  views

वेंगुर्ला : रोटरी क्लब ऑफ वेंगुर्ला मार्फत उभादांडा सागरेश्वर समुद्रकिनारी उभारल्या जाणाऱ्या रेस्क्यू टॉवर चे भूमिपूजन आज शुक्रवारी (२० फेब्रुवारी) संपन्न झाले. वेंगुर्ला नगराध्यक्ष दिलीप गिरप व उभादांडा सरपंच निलेश चमणकर यांच्या हस्ते व रोटरी वेंगुर्ला प्रेसिडंट रो. आनंद बोवलेकर, सेक्रेटरी रो. डॉ राजेश्वर उबाळे, ट्रेजरर रो. अनमोल गिरप, डिस्ट्रिक्ट सेक्रेटरी रो. राजेश घाटवळ यांच्या प्रमुख उपस्थतीत हे उदघाटन पार पडले. यावेळी बोलताना प्रेजिडेंट व सेक्रेटरी यांनी या टॉवर ची आवश्यकता व होणारे फायदे उपस्थिताना समजाऊन सांगितले. भविष्यात सागरेश्वर समुद्रकिनाऱ्या लगतच्या परिसरात समुद्रात बुडून होणाऱ्या दुर्घटना टाळणे हा आपला मुख्य उद्देश असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी रोटरी वेंगुर्ला चे माजी अध्यक्ष रो. राजू वजराटकर, रो. पंकज शिरसाट, रो. डॉ वसंतराव पाटोळे, रो. दिलीप शितोळे आदी रोटेरियन्स उपस्थित होते. पर्यटक, नागरिक व मत्स्यव्यावसायिक यांच्या जीवित संर‌क्षणाच्यादृष्टीने अत्यंत महत्वपुर्ण असणा- या या रोटरी प्रोजेक्टसाठी , रोटरी डिस्ट्रिक्ट ३१७० चे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर अरूण भंडारे यानी  रूपये २५ हजारची रोटरी डिस्ट्रिक्ट ग्रॅंट मंजूर केली आहे.