
वेंगुर्ले : वेंगुर्ले पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज नामनिर्देशन पत्र दाखल करण्याचा शेवटच्या दिवशीपर्यंत नगराध्यक्ष पदासाठी एकूण ८ तर नगरसेवक पदासाठी एकूण ११३ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. यात भाजपकडून नगराध्यक्ष पदासाठी दिलीप गिरप व सुहास गवंडळकर तर नगरसेवक पदासाठी ३३, शिंदे शिवसेनेकडून नगराध्यक्ष पदासाठी नागेश गावडे व उमेश येरम तर नगरसेवक पदासाठी २६, ठाकरे शिवसेनेकडून नगराध्यक्ष पदासाठी संदेश निकम तर नगरसेवक पदासाठी २३, काँगेस कडून नगराध्यक्ष पदासाठी विलास गावडे तर नगरसेवक पदासाठी १७, अजित पवार राष्ट्रवादी कडून नगरसेवक पदासाठी ३, अपक्ष म्हणून नगराध्यक्ष पदासाठी सोमनाथ टोमके व नंदन वेंगुर्लेकर तर नगरसेवक पदासाठी ११ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. दरम्यान राष्ट्रवादी शरद पवार गट या निवडणुकीत एकही अर्ज दाखल करू शकले नाही. उद्या येथील पालिकेत सर्व उमेदवार अर्जाची छाननी प्रक्रिया पार पडणार आहे.
वेंगुर्ले नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटच्या दिवशी नगराध्यक्ष पदासाठी ३ तर नगरसेवक पदासाठी २२ उमेदवारी अर्ज दाखल झाले. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडून आज नगराध्यक्ष पदाचे उमेदवार विलास गावडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.
तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाकडून नगरसेवक पदासाठी मनीष सातार्डेकर,जी जी टाककर,आणि सचिन वराडकर यांनी अर्ज सादर केले
आज नगराध्यक्ष पदासाठी विनायक सदानंद गवंडळकर( भाजप), विलास प्रभाकर गावडे (काँग्रेस) आणि नंदन मेघश्याम वेंगुर्लेकर (अपक्ष) यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. तर नगरसेवक पदासाठी प्रभाग क्र. १ ब
ॲड. मनिष वामन सातार्डेकर (अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी)
वंदन मेघः शाम वेंगुर्लेकर (अपक्ष)
प्रभाग क्र. २ अ
महिमा महेंद्र घाडी (शिवसेना)
प्रभाग क्र. २ ब
विधाता रमाकांत सावंत (काँग्रेस)
प्रभाग क्र. ३ अ
विनायक सदानंद गवंडळकर (भाजप)
प्रभाग क्र. ५ ब
विवेक श्रीगुरुनाथ कुबल (उबाठा)
सुयोग विजय चेंदवणकर (अपक्ष)
सुनिल शशिकांत डुबळे
(शिवसेना)
प्रभाग क्र. ६ अ
गितांजली गजानन गांवकर
(शिवसेना)
प्रभाग क्र. ७ अ
सुकन्या पॉल फर्नांडीस (काँग्रेस)
प्रभाग क्र. ७ ब
बाळकृष्ण पुंडलिक हुले (शिवसेना)
पांडुरंग लक्ष्मण मालंडकर
(काँग्रेस)
ॲड. गोविंद गोपाळ टाककर (अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस)
प्रभाग क्र. ८ अ
सुकन्या पॉल फर्नांडीस (काँग्रेस)
सुमन संदेश निकम (उबाठा)
प्रभाग क्र. ८ ब
संदेश प्रभाकर निकम (उबाठा)
अमर भास्कर जाधव(भाजप)
अब्दुलरहिम अल्ली शेख (काँग्रेस)
अजित यशवंत कनयाळकर(भाजप)
प्रभाग क्र. ९ अ
सचिन फटू वराडकर
(अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस)
चंद्रकांत कृष्णा जाधव (अपक्ष)
प्रभाग क्र. ९ ब
रत्नप्रभा सोमनाथ टोमके (अपक्ष)
यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. उद्या १८ नोव्हेंबर रोजी सकाळी दाखल उमेदवारी अर्ज यांची छाननी होणार आहे.










