
वेंगुर्ले : शिवसेनेचे मुख्य नेते तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार वेंगुर्ला तालुका शिवसेना महिला आघाडी तालुकाप्रमुखपदी शिरोडा येथील शीतल साळगावकर यांची निवड करण्यात आली. जिल्हा परिषद म्हापण, उभादांडा व रेडी मतदार संघ हे कार्यक्षेत्र त्यांना देण्यात आले आहे. सावंतवाडी येथे आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.
यावेळी आमदार दीपक केसरकर, आमदार निलेश राणे, माजी आमदार राजन तेली, जिल्हाप्रमुख संजू परब, संजय आंग्रे, जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर, महिला जिल्हाप्रमुख ऍड निता सावंत - कविटकर यांच्यासहित मान्यवर उपस्थित होते.










