'त्या' दोन्ही सरपंचांनी राजीनामे देऊन पुन्हा निवडणुकीला सामोरे जावे : नाना वालावलकर

Edited by: दिपेश परब
Published on: October 27, 2025 19:25 PM
views 70  views

वेंगुर्ले :  २५ ऑक्टोबर रोजी आडेली जिल्हापरिषद मतदार संघामध्ये गोगटे हॉल वेतोरे येथे भाजप पदाधिकारी मेळाव्यामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या दोन सरपंचांचा प्रवेश घेण्यात आला, ज्या मध्ये वायंगणी सरपंच दत्ताराम उर्फ अवी दुतोंडकर व दाभोली सरपंच उदय गोवेकर यांनी पक्ष प्रवेश केला, या कार्यक्रमासाठी या जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी उपस्थित होते, परंतु ग्रामपंचायत निवडणुकीला हे दोन्ही सरपंच उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाकडून निवडणुकीला सामोरे गेले होते, व त्यांना त्या भागातील पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या अथक मेहनतीनमुळे व भाजपच्या धनशक्तीला धूळ चारत शिवसेनेवर निष्ठा असणाऱ्या मतदारांच्या आशीर्वादावर निवडून आलेत, परंतु निवडून आल्या नंतर काही दिवसातच या दोन्ही सरपंचांनी सर्व मतदारांचा विश्वास घात करून स्वतःच्या स्वार्थापोटी भाजपात प्रवेश केला आहे.

म्हणून मि एक निष्ठावंत शिवसैनिक या नात्याने दोन्ही सरपंचांना आव्हाहन करतो कि तुम्ही आपल्या सरपंच पदाचा राजीनामा देऊन ज्या मतदारांनी भाजपच्या उमेदवारांना नाकारून तुम्हाला भरघोस मतांनी निवडून दिले होते त्या मतदारांसमोर भाजपच्या पॅनल वर उभे राहून पुन्हा निवडून येऊन दाखवावे असं आव्हान नाना वालावलकर  दिलंय.

तसेच माझा भारतीय जनता पार्टीच्या या जिल्ह्यातील नेत्यांना प्रश्न आहे कि, आज देशामध्ये, राज्यामध्ये व जिल्ह्यात आपली सत्तास्थाने असताना विरोधी पक्षाच्या लोकप्रतिनिधीना व पदाधिकाऱ्यांना आमीषे दाखवून आपल्या पक्षात घेऊन भाजपच्या करायकर्त्यांवरती व मतदारांवरती विश्वास नसल्याची नामुष्की आपल्यावर का आली यांचे आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे का?  आणि यांचे उत्तर येणाऱ्या जिल्हापरिषद व पंचायत समिती निवडणुकीत सुज्ञ मतदारच आपल्याला देतील यात शंका नाही असेही वालावलकर यांनी सांगितले आहे.