जेष्ठ नागरिकांच्या तक्रारी ऐकून सोडविण्याची ग्वाही

वेंगुर्लेत पोलीस ठाण्यातर्फे "जेष्ठ नागरिक संवाद मेळावा"
Edited by: दिपेश परब
Published on: October 19, 2025 20:38 PM
views 49  views

वेंगुर्ले : वेंगुर्ले पोलीस ठाण्याच्या वतीने "जेष्ठ नागरिक संवाद मेळावा" सातेरी मंदिर हॉल, रामघाट वेंगुर्ला येथे पोलीस अधीक्षक श्री मोहन दहिकर व अतिरिक्त पोलिस अधीक्षक महोदया नयोमी साठम मॅडम यांच्या प्रेरणेने व मार्गदर्शनाखाली  सामाजिक कार्यकर्ते तथा माजी नगराध्यक्ष सुनील डुबळे यांच्या अध्यक्षते खाली वेंगुर्ला पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी,  उपनिरीक्षक शेखर दाभोलकर, वेंगुर्ला पोलीस स्टेशन चे अंमलदार, पोलीस पाटील तसेच सामाजिक कार्यकर्ते संजय गावडे, ड्रॉ.जयश्री खडपकर यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी जेष्ठ नागरिकांच्या तक्रारी ऐकून घेऊन पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी यांनी त्यांच्या प्रश्न सोडवण्या साठी पोलीस त्यांच्या सोबत असल्या ची ग्वाही दिली, तसेच स्व रचित " पाखरू" ही ज्येष्ठ नागरिकांच्या जीवनावर आधारित कविता जेष्ठ नागरिकांना ऐकवून टाळ्यांची दाद मिळविली.

या कार्यकमात सामाजिक कार्यकर्ते संजय गावडे यांनी जेष्ठ नागरिक मेळावा आयोजनात महत्वाची भूमिका बजावली, असे मत व्यक्त केले. पोलीस उपनिरीक्षक शेखर दाभोलकर यांनी "पोलिसांची जेष्ठ नागरिकांन प्रति असलेली तळमळ बोलून दाखवून, तुम्ही एकटे नसून पोलीस तुमच्या सोबत असल्याची ग्वाही दिली, अधीक्षीय भाषणात सामाजिक कार्यकर्ते सुनील डुबळे यांनी "पोलीसांच्या स्तुत्य कार्यक्रमाचे कौतुक केले". सावंतवाडी येथील कपिल कांबळे यांच्या ऑर्केस्ट्रा मधील सदाबहार गाण्यानी कार्यक्रमाची रंगत अधिकच वाढली. ड्रॉ. जयश्री खडपकर यांनी जेष्ठ नागरिकांची आरोग्य तपासणी करून औषध वाटप करण्यात आले. तसेच सर्व ज्येष्ठ नागरिकांना दीपावलीच्या शुभेच्छा देऊन दिवाळी गिप्ट वाटप करण्यात आले . यावेळी वेंगुर्ला पोलीस स्टेशन मधील अधिकारी अंमलदार सर्व पोलीस पाटील यांनी सहभाग घेतला. पोलीस कॅनस्टेबल मनोज परुळेकर यांनी सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन केले व पो.शी.जयेश सरमळकर यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले. एकूणच आजची दिवाळी पोलिसांनी जेष्ठ नागरिकांसोबत आनंदात साजरी केली.