
वेंगुर्ला : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित सेवा पंधरवडा साजरा करत असताना डॉ. वसुधाज योगा ॲन्ड फिटनेस ॲकडमी वेंगुर्ला आणि भा.ज.प. वेंगुर्ला यांच्या महिला आघाडीच्या सहकार्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कातकरी समाजातील मुलांना नाग्या म्हहादू आदिवासी वसतिगृह वेताळ बांबार्डे येथे "स्पोर्ट्स योगासना" चे प्रशिक्षण देण्यात आले.
या मुलांना विमामुल्य कायम स्वरूपी प्रशिक्षण देण्यात येत असल्याचे डॉ. वसुधा मारे यांनी सांगितले आणि स्वतः डॉ. वसुधा मोरे यांच्यासह त्यांचे सहकारी रामा पोळजी,मनोज बेहरे, गौरव गंगावणे आणि मोना नाईक यांनी मुलांना प्रशिक्षण दिले. तर भाजप वेंगुर्ला महिला मोर्चाच्या कार्यकत्या वृंदा मोर्डेकर यांनी विशेष मदत केली. डॉ. वसुधा मोरे यांनी या मुलांना ऑलिंपिक स्पर्धेसाठी तयार करण्याची इच्छा आणि प्रशिक्षणाची जबाबदारी घेऊन मुलांना निरंतर सराव करण्यासाठी प्रोत्साहीत केले.
या मुलांना कोणत्याही शासकीय मदती शिवाय सांभाळणारे,पालन-पोषण करणारे उदय आईर आणि त्यांच्या पत्नी उजा आईर यांनी उत्तम सहकार्य करून सर्वांचे आभार मानले.










