
वेंगुर्ला : रोटरी क्लब ऑफ वेंगुर्ला मिडटाऊन मार्फत यावर्षीच्या रोटरी एक्सलन्सी अवॉर्ड चे वितरण रोटरी डिस्ट्रिक्ट ३१७० चे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर मान अरुण भंडारे यांच्या हस्ते आणि असिस्टंट गव्हर्नर रो डॉ कोलते यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले. यावेळी पोलियो डिस्ट्रिक्ट सेक्रेटरी मान राजेश घाटवळ, वेंगुर्ला क्लब प्रेजिडेंट रो आनंद बोवलेकर, सेक्रेटरी रो डॉ राजेश्वर उबाळे तसेच वेंगुर्ला रोटरी क्लब चे सर्व सदस्य उपस्थित होते.
यावेळी वेंगुर्ला तालुक्यात उत्कृष्ट कामगिरीचे सातत्य राखणाऱ्या ५ शिक्षकांना रोटरी एक्सलन्सी अवॉर्ड ने सन्मानित करण्यात आले. यामध्ये शाळा वेंगुर्ला नं १ चे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर हरमलकर, शाळा वजराट नं १ चे मुख्याध्यापक संजय परब, शाळा उभादंडा नं ३ च्या मुख्याध्यापिका नेहा गावडे, शाळा परबवाडा नं १ चे मुख्याध्यापक रामचंद्र झोरे आणि शाळा मातोंड पेंढऱ्याची वाडी चे उपशिक्षक समीर तेंडोलकर या आपल्या शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केलेल्या शिक्षकांना गौरविण्यात आले.
सत्कारप्रती आभार व्यक्त करताना श्री संजय परब यांनी रोटरी च्या कार्याचा थोडक्यात आढावा घेऊन वेंगुर्ला रोटरी क्लब सातत्याने करत असणाऱ्या समाजाभिमुख कामाचे कौतुक केले. यावेळी रोटरी वेंगुर्ला चे उपाध्यक्ष एँड प्रथमेश वेंगुर्लेकर, ट्रेजरर अनमोल गिरप, वेंगुर्ला शहराचे माजी नगराध्यक्ष दिलीप गिरप, सचिन वालावलकर,माजी अध्यक्ष योगेश नाईक, सुनील रेडकर, पंकज शिरसाट, मृणाल परब, रो स्वप्नील झाट्ये, डॉ पाटोळे, रो भेंडवडे,रो पडते आदि रोटरियन उपस्थित होते. याकार्यक्रमाचे सूत्रसंचालन रो. राजू वजराटकर यांनी केले तर आभार सेक्रेटरी रो. डॉ. उबाळे यांनी मानले.










