
वेंगुर्ला : ग्रामपंचायत अणसुर येथे प्राथमिक आरोग्य केंद्र रेडी व आयुष्यमान आरोग्य मंदिर मोचेमाड यांच्या माध्यमातून स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान आरोग्य शिबिर संपन्न झाले. या शिबिरात ८६ लाभार्थ्यांनी लाभ घेतला. ग्रामपंचायत अणसुर येथे दिनांक २५ सप्टेंबर रोजी "स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान" अंतर्गत महिलांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या आरोग्य शिबीराचे ऊदघाटन सरपंच सत्यविजय गावडे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. यावेळी उपसरपंच वैभवी मालवणकर, प्राथमिक आरोग्य केंद्र रेडीचे वैद्यकीय अधिकारी डॉ.विवेक कदम, ग्रामपंचायत अधिकारी सायली सातोसे, ग्रामपंचायत सदस्य सीमा गावडे, संयमी गावडे, प्रज्ञा गावडे, साक्षी गावडे, वामन गावडे, सुधाकर गावडे, भाजपा पदाधिकारी आनंद ( बिटू )गावडे, शक्तिकेंद्र प्रमुख गणेश गावडे, बूथ प्रमुख वामन गावडे, प्रभाकर गावडे, अंगणवाडी सेविका भक्ती गावडे, मदतनिस अन्नपूर्णा गावडे, आशा सेविका अनुष्का तेंडोलकर, ग्रामपंचायत कर्मचारी आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक , सूत्रसंचालन , आभार प्रदर्शन रेडी आरोग्य केंद्राचे आरोग्य सहाय्यक संजय करंगुटकर यांनी केले. या शिबिरात ८० लाभार्थ्यांनी औषधोपचाराचा लाभ घेतला.










